अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दहिवद येथे वीज पडून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना पोळ्याच्या दिवशी घडली आहे.

येथील रहिवासी आबा हरी माळी यांच्या मालकीचा बैल पोळ्याच्या सण असल्याने त्यांनी चारा खाऊ घालून दुपारी पूजनासाठी आणला. नंतर दहीवद टाकरखेड़ा रस्त्यावर शेतात निबाच्या झाडाला दोन्ही बैल बांधले आणि चारा टाकला मात्र, सायंकाळी पाच वाजता जोरात विज कडाडली . यात एका बैलावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थली पशुवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील ,तलाठी एस.बी.पंचभाई कोतवाल , प्रदीप देसले यांनी पंचनामा केला.
पोळ्याच्या दिवशी हे आसमानी संकट कोसळल्याने संपूर्ण माळी कुटुंबाला अश्रु अनावर झाले होते. आबा माळी यांचे पंचेचाळीस हजाराचे नुकसान झाले आहे. शेतातील राहिलेली कामे करणे जिकिरीचे जाणार आहे.







