• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मद्यपान केल्यानंतर तिघा पोलिसांचा धिंगाणा : धक्काबुक्की झाल्यानंतर निघताना सायकलस्वाराला दिली धडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2024
in जळगाव
0

जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भरदुपारी बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाली. त्यानंतर कार काढताना काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. सुदैवाने यात मुलाला मोठी दुखापत झाली नाही. ही घटना रविवारी दिनांक २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली.

हे पोलिस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली असून ते जिल्ह्यातीलच असल्याची माहिती मिळत आहे.काल रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी आले. ते गणवेशातच होते व वर जॅकेट घातले होते. सुरुवातीला मद्यपान केल्यानंतर ते निघून गेले. मात्र काही वेळाने परत तेथे आले व पुन्हा मद्यपान केले. बारमध्ये बसलेले असतानाच तेथे दोन ग्लास त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू होती.

Oplus_131072

हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व चांगलीच पकडापकडी झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला. तर्रर्र झालेले हे कर्मचारी कारमध्ये (क्र. एमएच ०२, ईएच १०४८) बसले व ती काढत असताना दोन दुचाकींना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. विशेष म्हणजे या कारवर पोलिसांचा लोगोदेखील आहे. त्यानंतर कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. त्यात तो मुलगा खाली पडला तरीदेखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. यात सुदैवाने मुलाला काही दुखापत झाली नाही. हा सर्व प्रकार बारसह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

या वादाविषयी परिसरातील काही व्यावसायिकांनी जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी तेथे कर्मचारी सलीम तडवी व त्यांचे सहकारी पोहचले. त्यांना कारचालक पसार होताना दिसल्याने त्यांनी पाठलाग केला. मात्र तो भरधाव वेगाने निघून गेला. या घटनेचे दिवसभर चर्चा होती आता पोलीस अधीक्षक या घटनेबद्दल काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.


 

Previous Post

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे उपचारादरम्यान पहाटे निधन

Next Post

धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon