पाचोरा ( प्रतिनिधी ) ;- येथील पाचोरा पोलीस स्टेशनच्या ६ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असून ते आपली शासकीय सेवा उत्तमरीत्या बजावीत आहेत . तर या कर्मचाऱ्यांपैकी ४ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते . मात्र या चार कर्मचाऱ्यांनी न डगमगता धीरोदात्तपणे आपले कुटुंब आणि जनतेची सेवा अशी दोन्ही कामे अगदी चोखपणे बजावीत आहेत.
सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असतांना दुसऱ्या लाटेचा धसका अनेकांनी घेतला असून कोव्हीड लस घेण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र पाचोरा पोलीस स्टेशनच्या ६६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः लस घेऊन लसींपांसून काहीही नुकसान होत नसल्याचा जणू एकप्रकारे संदेश दिला आहे .
पाचोरा पोलीस स्टेशनचे एएसआय श्री. चौधरी ,पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील, पोलीस नाईक सुनील पाटील, हवालदार हंसराज मोरे आदींनीही कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या मनात थोडी चिंता निर्माण होणे साहजिक आहे. मात्र कुटुंबियांना या जीवघेण्या आजारापासून परावृत्त करून ड्युटी बजावणे अशी दुहेरी कामगिरी निभावणे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी याप्रसंगी बोलताना काढले आहे . सर्वानी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी केले आहे.