• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ येथील २५ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा ; चालकच निघाला मुख्य सूत्रधार..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ येथील २५ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा ; चालकच निघाला मुख्य सूत्रधार..!

जळगाव एलसीबीकडून ६ आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त

 

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५.४२ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात, फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे ज्या कंपनीत (रॉयल कंपनी) खाजगी नोकरी करतात, त्याच कंपनीचा ड्रायव्हर, शाहीद वेग, हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी शाहीद बेगसह एकूण ०६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये रोख आणि ०३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. दि.२८ रोजी रात्री २२:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन हे त्यांच्या कार्यालयातील २५,४२,०००/- रुपये एका बॅगेत घेऊन मोटार सायकलने (एमएच-१९-बीसी-५५८६) घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाई नगरकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर, ३ अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटार सायकलला धक्का दिला.

फिर्यादीचा तोल गेल्यानंतर, आरोपींनी मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावली. ते मोटार सायकलवर बसून पळून गेले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात फिर्यादीचा चालक शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत, शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली.

शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती. त्यानेच अकाऊंटंट असलेले फिर्यादी यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची ‘टिप’ त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली. मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान यूनुस खान आणि इजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. घटनेच्या रात्री, या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला.\

तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकला आहे. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी दि.३१ रोजी सर्व ०६ आरोपीना अटक केली आहे. यात शाहीद बेग इब्राहिम वेग (वय २५, रा. भुसावळ), मुजाहिद आसीफ मलौक (वय २०, रा. भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ), अजहर फरीद मलक (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर), ईजहार वेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर) यांचा समावेश आहे.

आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केवल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये जप्त करण्यात आले असून, उर्वरित २ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करणे आणि गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी, पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयाने दि.०३ रोजीपावेतो पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

सदरचा गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. हे करीत आहेत.उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, भुसावळ उपविभाग, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्था.गु.शा. जळगांव, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुका पो.स्टे. पांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अमलदार यांचे पथकातील थे.पो.उप. निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.हे.कॉ. प्रेमचंद सपकाळे, पो.ना.श्रीकृष्ण देशमुख, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. राष्ट्ररत वानखेडे, पो.कॉ. ईश्वर पाटील, चापोहेकॉ. दर्शन ढाकणे सर्व नेम. स्था.गु.शा. जळगांव तसेच पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, पोहेको वाल्मीक सोनवणे, पाहेकॉ. सुधीर विसपुते, पो.हे.कॉ. जितु ठाकरे सर्व नेम. भुसावळ तालुका पो.स्टे., पोकॉ. योगेश माळी, पोकों, भुषण चौधरी, पो.कॉ. अमर अढाळे, पोकों प्रशांत सोनार सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. पो. को प्रमोद पाटील नेम रावेर पो.स्टे. यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.


 

 

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचेसमवेत विकास कामासंदर्भात चर्चा

Next Post

दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

दुसरा फरार आरोपी सापडला दोंडाईचा तालुक्यात : अमळनेर तालुक्यात घडली होती घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जैन कंपनी

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

March 21, 2026
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार
1xbet russia

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon