रावेर (प्रतिनिधी) – रावेर पोलीस ठाण्यात बुलढाणा येथून बदलुन आलेले नूतन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचा अभोडा खुर्द या गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कला व सांस्कृतिक विभागाचे तालुका अध्यक्ष कुणाल पवार, पो.पा (अभोडा) चिंतामण पवार, ग्रा.पं.सदस्य रमेश पवार,शिक्षक विजय पवार,पो.पा गोकुळ पवार,मनोज पवार, वैभव राठोड, अरविंद पवार, कुंदन राठोड,मधुकर पवार,रा.काँ.ता.संघटक गौरव महाजन,ई.मान्यवर उपस्थित होते.
नूतन पोलीस निरीक्षक म्हणाले रावेर पोलिसांची जनमानसातील प्रतिमा अधिक उंचवण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार व सर्व सामान्य लोकांमधे सकारात्मकतेची भावना निर्माण करणार. आणि निरीक्षक नागरे बोलले की जन सामान्य माणसांनी मागीतलेली मदतीचा नक्कीच लवकरात लवकर दक्षता घेतली जाईल.







