चोपडा शहरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया परिसरातून दि.२५ रोजी सकाळी ११:३० ते ११:४५ वाजेच्या दरम्यान एका वृद्धाच्या पिशवीतून ५५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजमल केशव पाटील (वय ७५, रा.खाचणे ता. चोपडा) हे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया येथे गेले होते. तेथून परतताना त्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेले ५५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. त्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास चोपडा पोलिस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करत आहे.