पिंपळगाव हरेश्वर ( प्रतिनिधी ) – धाडसी चोरी, तब्बल 46 ग्रॅम सोन्याच्या,चांदीच्या दागिन्यांसह रोख लंपास.पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
पिंपळगाव पोलीस स्टेशन परिसरातील शहापूरा या गावातील गणेश रुपचंद परदेशी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी घराची कडी खोलून घरातील पेटीचा कोंडा तोडून पेटीत ठेवलेल्या 47 ग्रॅम सोन्यासह 8 भार चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपयांची रोख लंपास केली.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा रजिस्टर नंबर 180/ 2023 भादवी 454 /380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय अमोल पवार करीत असून सदर घटनास्थळी डीवायएसपी श्री येरुळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी भेट दिली आहे.