विविध पिकांसाठी जिल्ह्यात कृषी विभागाची योजना
जळगाव (प्रतिनिधी) :– राज्यातील प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, हा हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना आदिवासी गट व सर्वसाधारण गट असे दोन गटानमध्ये राबविण्यात येत आहे. पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रूपये सर्वसाधारण गटासाठी रक्कम रूपये ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रू १५० राहिल.
पिक स्पर्धा मध्ये खरोप हंगामात मुग उडीद या दोन पिकांसाठी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०२४ असुन ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे भाग घेण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले आहे