जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १२ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. रविवारी सकाळी दुकानावर मटन घेऊन येते असे सांगून ती मुलगी घराबाहेर पडली. दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकाकडे कुटुंबीयांनी तिचे शोधाशोध सुरू केली. सायंकाळीसुध्दा ती घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि प्रमोद कठोरे करीत आहेत .







