जळगाव एमआयडीसी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- फॅक्टरीच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले. ही घटना तालुक्यातील उमाळा फाट्याजवळ ईश्वर पल्प व पेपर मिल नावाच्या फॅक्टरीच्या कंपाउंडमध्ये गुरुवार दि. २४ रोजी रात्री घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ईश्वर पल्प व पेपर मिल कंपनीच्या कंपाउंडमध्ये विविध साहित्य ठेवलेले होते. चोरट्यांनी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान या कंपनीमध्ये प्रवेश करून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे १ स्टेनलेस स्टील व्हाल, ४० हजार किमतीचा लोखंडी धातुचा पिस्टल बेअरींग, स्टेनलेस स्टील रिड्युसरपाईप, लेथ मशीन गेअर, पाच हजार किमतीची एक लोखंडी धातुचा फेल्ट्रोल पेडीसन तसेच बेअरींग असे सुमारे १ लाख ६५ हजाराचे साहित्य घेत चोरटे पसार झाले.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फॅक्टरीच्या व्यवस्थापनाने तपासणी केली. त्यानंतर याप्रकरणी भवानजी विश्रामभाई पटेल (वय ६४, रा. शिवरामनगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार सोमवार दि. २८ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनि संजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी फॅक्टरीत धाव घेतली. कंपाउंडमध्ये पाहणी करुन माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याच्या कामाला पोलिसांनी गती दिली आहे. या प्रकरणी तपास पोना मुकुंद पाटील, किशोर पाटील हे करीत आहेत.