जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम शिवारातील शेतात काम करणाऱ्या सालदाराच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला होता . या हत्याकांडातील आरोपी पती दरबार बारेला (पावरा) याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
कुंभारी सीम येथील पोलीस पाटील योगेश रमेश पाटील यांचे काका सुरेश गंगाराम पाटील यांच्या शेतात वर्षभरापासून मूळचा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मुंडिया ( पोस्ट – चिरिया ) येथील रहिवाशी दरबार मिठाराम बारेला ( पावरा , वय ५५ ) सालदार म्हणून कामाला आहे . तो शेतातच कुटुंबियांसह राहतो . या दाम्पत्याला ४ मुले आणि ३ मुली मिळून ७ अपत्ये आहेत . या दाम्पत्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले. किरकोळ वादातून त्यांचे नेहमी पत्नी सोबत भांडणे होत असत .
असेच किरकोळ कारणावरून या दोघांचे २५ डिसेंबररोजी रात्री भांडण झाले होते या भांडणात पती दरबार बारेला याने पत्नी मुन्नीबाई बारेला हिला लाकडी काठीने मारहाण केली होती . या जबर मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे पती दरबार बारेला याच्या लक्षात २६ डिसेंबररोजी सकाळी आले होते . शेतमालक सुरेश पाटील आणि कुंभारी सिमचे पोलीस पाटील योगेश पाटील यांना सोबत घेऊन दरबार बारेला याने तिला आधी जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तेथे डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणले . येथे सीएमओ डॉ यासिर खान यांनी मुन्नीबाईला मृत घोषित केले . कुंभारी सिमचे पोलीस पाटील योगेश पाटील यांनी या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना दिली . सीएमओ डॉ यासिम खान यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली .
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पो उ नि जगदीश मोरे व यांनी सीएमओ डॉ यासिर खान यांनी या मृतदेहाची पाहणी केली त्यावेळी मुन्नीबाईच्या शरीरावर कपाळ , पोट , हात – पाय , पाठ आणि मांड्यांवर अशा अनेक ठिकाणी मारहाणीमुळे झालेले काळे – निळे व्रण दिसत होते . जबर मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला असा संशय पोलीसांना झाला पोलिसांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातच दरबार बारेला याला ताब्यात घेतला होते या घटनेची नोंद जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून घेण्यात आली व गुन्हा पुढील तपासासाठी जामनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला होता
मयत मुन्नीबाई बारेला हीच भाऊ धनसिंग बारेला याच्या फिर्यादीवरून दरबार बारेला यांच्याविरोधात २७ डिसेंबररोजी भा द वि कलम ३०२ , २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता . मारहाणीसाठी वापरलेली काठी पोलिसांनी जप्त केली आहे . दि.३८ रोजी या आरोपीला न्यालयात हजर केल्यावर त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली . पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे स पो नि राठोड करीत आहेत .