अमळनेर तालुक्यातील जानवे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जानवे येथे पतीनेच पत्नीवर धारदार वस्तूने डोक्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. वार चुकविण्याच्या नादात पत्नीची हाताची तीन बोटेच छाटली गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा हल्लेखोर पती फरार झाला आहे. अमळनेर पोलीस घटनेची माहिती घेत आहे.
सुनीता प्रदीप भिल (वय ३०, रा. थाळनेर ता शिरपूर) ही महिला पतीसह जानवे येथे नातेवाईकांकडे आली होती. २१ रोजी सकाळी ती जानवे येथे पतीसोबत शेतात कामाला गेली. तेथे काही करणावरून वाद झाल्याने तिच्या डोक्यावर पतीने धारदार वस्तूने तीन वार केले. तसेच तिच्या हातावर वार करून डाव्या हाताचा अंगठा तोडला व उजव्या हाताची दोन बोटे तोडली. साधारणतः दहा वाजेच्या सुमारास शेतातून महिला घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली.
जखमी सुनीताला जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सुनिताची प्रकृती गंभीर असल्याने तिला धुळे येथे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिचा पती फरार झाला आहे. घटनेबाबत अमळनेर पोलीस माहिती घेत आहे.