
२ लाख रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास; पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरात बसस्थानक परिसरात महिलेच्या हातातील सोन्याची पाटली हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे २ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस नोंदीनुसार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास पारोळा बसस्थानकाजवळ ही घटना घडली. सौ.कल्पनाबाई शिवाजी पाटील (रा.पळसखेडे, ता.पारोळा) या फिर्यादी महिलेच्या हातातील सुमारे ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलेच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, पारोळा पोलीस ठाणे, करीत असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.









