सार्वे बुद्रुक गावात स्वतःच्याच शेतात घेतले विष
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वे बु. येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय कृष्णा पाटील (वय ५५, रा. सार्वे बु. ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ता गावात परिवारासह राहत होते. त्यांच्यावर सोसायटीचे व हातउसनवारीचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शुक्रवारी दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता त्यांनी त्यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धुळे येथे रेफर केले. मात्र दुपारी १ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची नोंद पारोळा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.