एरंडोल तालुक्यात विविध गावात भेटी
पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी मंगळवारी एरंडोल तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी विविध गावात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
गावोगावी जाऊन उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचे शुभाशीर्वाद घेऊन आवाहन केले.यावेळी नागरिकांनी अमोल पाटील यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी अमोल पाटील यांनी पातरखेडा, जळू, नांदखुर्द बुद्रुक, नांदखुर्द, फरकांडे, जामफळ, उमरे, मालखेडा,आडगाव, कासोदा येथे प्रचार दौरा केला.
मतदार संघातील विकास कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चांगले व्हिजन घेऊन महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात प्रयत्न केले जातील अशी माहिती या वेळेला अमोल चिमणराव पाटील यांनी दिली. विविध गावांमध्ये ग्रामस्थांना नमस्कार करून भेटी-गाठी घेतल्या. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचाराचे प्रभावी नियोजन केले.