पारोळा(प्रतिनिधी)-प्रशासनाने अनेक उपाय करून देखील लोकांच्या बेफिकीर वृत्ती मुळे कोरोना दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आज पारोळा शहरात पोलीस आणि नगरपरिषद प्रशासन यांनी संयुक्तिकरित्या विना मास्क व रिकामे फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. यांत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे स्वतः आपल्या पोलीस पथकासह महामार्गालगत भर दुपारी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत फिरत होते.ज्या दुकानांना शासनाने परवानगी दिली ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची त्या व्यापारी बांधवांना विनंती की त्यांनीही कृपया ११ च्या पुढे दुकाने उघडी करू नयेत दुकाने सीलची कारवाई आता मोठ्या प्रमाणात वेगाने होणार असल्याचे भंडारे यांनी सांगितले.विनाकारण रोडवरील गर्दी टाळावी सगळे मिळून पारोळा कोरोना मुक्त करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी केले आहे.