जळगाव(प्रतिनिधी ) ;- राज्यात आघाडी सरकार असून एरंडोल पारोळा मतदार संघात शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. मात्र आघाडी सरकारने ६०. २०. २० असा निर्णय झाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शासकीय कमिट्यांवर नियुक्त्यांबाबत याद्या देऊनदेखील पालकमंत्री यांनी एकाही कार्यकर्त्याची नियुक्ती केली नसून यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कार्यकर्त्यांचा शासकीय कमिट्यांमध्ये समावेश करावा अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.