पारोळा ;- पारोळा येथे जय झुलेलाल सिंधी पंचायतच्या वतीने अमर शहिद हेमु कालानी यांना त्यांच्या शहिद दिवस साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक असे आज दि,२१ जानेवारी गुरूवार रोजी अमर शहिद हेमु कालानी यांचा संपुर्ण देशात शहिदी दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो . त्या निमित्त पारोळा सिंधी पंचायतच्या वतीने ही आज शहिदी दिवस साजरा करण्यात आला, सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते अमर शहिद हेमु कालानी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अशोककुमार लालवाणी यांनी शहिद हेमु कालानी यांच्या जिवनाचा सविस्तर वृतांत सांगितला . अमर शहिद हेमु कालानी यांचा जन्म २३ मार्च १९२३ रोजी सिंध येथिल सख्खर जिल्ह्यात झाला अवघ्या सात वर्षाचे असतानाच त्यानी तिरंगा हाती घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते शामिल झाले ,तर १९४२ मध्ये १९ वर्षाच्या वयात त्यांनी अग्रेंजाना भारत छोडो च्या नाऱ्याने हैरान करून सोडले होते. या नव तरूणाचा उत्साह पाहुन संपुर्ण सिंध मधील तरूणा मध्ये जोश संचारला व संपुर्ण सिंध वासी या नवतरूणा सोबत झाले व अंग्रेज जा ना सिंध मध्ये सडो कि पडो करून सोडले,या सर्व गोष्टीचा सुगावा अंग्रेज सरकारला लागताच त्यांनी या नवतरूणा ला अटक करून जन्मठेपेतची शिक्षा सुनावली तरी त्यांनी हिम्मत न हारता कारागृहातुन हि आपली रणनिती सुरूच ठेवली व कारागृहात ही देशप्रेमाची ज्योत जागवली तेव्हा अंग्रेज सरकार ने त्यांची जन्म ठेपेची शिक्षा हि फांसी मध्ये रूपातंर केली अवघ्या विस वर्षाच्या विर तरूणा ला २१ जानेवारी १९४३ रोजी फांसी देण्यात आली. यावेळी त्यांना शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्यांनी परत भारत भुमीवर जन्म घेण्याची इच्छा प्रकट करित इन्कलाब जिंदाबाद चा नारा दिला. यावेळी संपुर्ण सिंध प्रांतात शोककळा पसरली . अश्या या विर शहिदच्या शहिद दिवस त्यांना अभिवादन करून साजरा करण्यात आला . या वेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने भारतीय सिंधु सभा,अखंड सिंधी फांऊडेशन,राष्ट्रीय सिंधी मंच,राष्ट्रीय सिंधी एकता मंच,भारतीय सिंधी संगम,तसेच पारोळा शहरातील समाजाचे मुखी सुरेश हिंदुजा,समाजध्यक्ष शंकर हिंदुजा,उपाध्यक्ष मनोहरलाल हिंदुजा,समाजाचे जेष्ठ बालचंद नंदवाणी,महेश हिंदुजा,अशोककुमार लालवाणी, हिंदुजा, वालेचा,जितेंद्र हिंदुजा,लखन नंदवाणी, विष्णु वालेचा,राजकुमार नागदेव, यांच्या सह समाज बाधंव उपस्थित होते.








