• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या उमेदवारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं 2019 साली सरळ सेवा भरती अंतर्गत साडेचार हजार उमेदवारांची निवड केली होती. मात्र, त्यापैकी 3200 चालक आणि वाहक अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात आज या उमेदवारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उमेदवारांनी आपल्या समस्या मांडून फडणवीसांकडे मदतीची मागणी केली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय पाऊलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अधिक माहितीनुसार, एसटी महामंडळानं 2019 झाली सरळ सेवेअंतर्गत महाराष्ट्रातून 4500 उमेदवार निवडले होते. त्यापैकी तेराशे उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना रुजू करण्यात आलं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात 3200 उमेदवारांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं. यासंदर्भात उमेदवारांनी वारंवार परिवहन मंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला. मात्र, अद्याप प्रशिक्षण सुरू होत नाही असं उमेदवारांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या काळात खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे आता सरळ सेवा अंतर्गत भरती झालेल्या 3200 उमेदवारांचे वेतन द्यावं आणि तातडीने प्रशिक्षण देऊन नियुक्ती करावी अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे. या उमेदवारांमध्ये अनेक महिलासुद्धा आहेत. ज्या एसटी चालक (ड्रायव्हर ) आणि कंडक्टर (वाहक ) चं प्रशिक्षण घेण्यास तयार असून महाराष्ट्रच्या ग्रामीण भागातील रस्त्यावर एसटी चालवण्यासाठीदेखील तयार आहेत.

या इच्छूक महिलांनाही सेवेत सामावून घेतलं जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून तातडीने यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. खरंतर, दोन दिवसांआधीच “ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल”, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. “चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे”, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे आता यादेखील उमेदवारांच्या नोकरीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे.


 

 

Previous Post

पारोळा येथे शहिद हेमु कालानी यांना अभिवादन

Next Post

एमपीएससी संदर्भात आम्ही योग्य मार्ग काढू – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमपीएससी संदर्भात आम्ही योग्य मार्ग काढू - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!
1xbet russia

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

जामनेर बस आगारातून चक्क अख्खी बसच चोरीला!

August 11, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon