• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई; तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई; तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त

पुणे जिल्ह्यातील तिघे आरोपी अटकेत; मोटारसायकलसह सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा ग्रामीण पोलिसांनी शस्त्रविरोधी कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे, आठ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ रस्त्यावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात तीन लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे कट्टे आढळून आले. प्रत्येक कट्ट्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असून त्यासोबत पिवळ्या धातूची आठ जिवंत काडतुसे मिळून आली. या काडतुसांच्या मागील बाजूस इंग्रजीत ‘KP 7.65’ असे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय संशयितांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल शुभम पाटील यांच्या फिर्यादीवरून साहील दगडू आवारे (वय १९), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड परिसर) तसेच रोहित चंद्रकांत जुजगर वय ३० पुणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी हे संगनमताने गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगून मोटारसायकलवरून त्यांची चोरटी वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्याद पोलीस नाईक शुभम ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे करीत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’

कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून
क्राईम

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

October 6, 2026
वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध
क्राईम

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon