डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे नेतृत्व
जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या पाईप चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चार सदस्यीय एसआयटी पथक तयार केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे व रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास दामोदर हे या गुन्ह्याचा तपास करणार आहेत.
पाईप चोरी प्रकरणाची व्याप्ती किती आहे हे तपासून सखोल चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणांमध्ये जितके गुन्हे दाखल आहेत त्याचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल अशी माहिती मिळाली. यात आणखी कोणाचा समावेश आहे का हे चौकशीअंति निष्पन्न होणार आहे.