जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पहूर येथील १३ वर्षीय मुलीचा रस्ता आडवून विनयभंग करणाऱ्यावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १३ वर्षीय मुलगी कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जून मोरे (वय – २०) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलीसात गेला तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी दिली. पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.