• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पहुरचे मायलेक अपघातात ठार, चिमुकलीचे मात्र पितृछत्र हरपले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2020
in जळगाव
0

सिल्लोड तालुक्यातील शिवना मार्गावर

पॅजो-दुचाकीचा भीषण अपघात

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेसह त्यांच्या मुलाचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे शिवना- मादणी मार्गावर झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. हा अपघात पॅजो रिक्षा व दुचाकीत झाला असून यात महिलेची चिमुकली नात ऐश्वर्या जखमी झाली असून तिला जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मालताबाई सुभाष थोरात यांची लहान सुन शितल सागर थोरात यांचे माहेर लाखनवाडा (जि. बुलढाणा) येथे आहे. बाळंतपणानंतर माहेरहून सूनेला पहूर गावी आणण्याकरीता आज सकाळी मालताबाई त्यांच्या स्वतःच्या पॅजो मालवाहू गाडीने मुलगा सागर व नात ऐश्वर्या यांच्यासह लाखनवाडा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवास सुरु असतानाच शिवना- मादणी मार्गावर समोरून आलेल्या दुचाकी (एमएच 20 एफ. 6481) आणि लाखनवाड्याकडे जाणार्‍या त्यांच्या पॅजो (एमएच 19. 3372 ) यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मालताबाई सुभाष थोरात (वय 50) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर थोरात (वय 27) यांची जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. सुदैवाने अपघातात 7 वर्षांची चिमुकली ऐश्वर्या बचावली असून दुचाकीवरील दोघे जण (रा. मादणी) जखमी झाले आहेत.

मालताबाई या बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवित होत्या. सागर हा सुद्धा आई- वडीलांना मदत करायचा. पतीच्या खांद्याला खांदा लावून मालताबाईंनी भाजीपाला विक्री व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली होती. अपघाताची वार्ता समजताच पती सुभाष थोरात यांच्यासह मुलाने एकच आक्रोश केला. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करून मालताबाई घरी आल्या होत्या. कोरोनाला हरविले. पण अपघाताने नेले अशीच दुर्देवी परिस्थिती त्यांच्या बाबतीत घडली असून या हृदयद्रावक घटनेने पहूरसह जामनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


 

 

Previous Post

आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते गौऱ्यापाडा गावठाण सेपरेशन करणे कामाचा शुभारंभ

Next Post

उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना तशाच पुर्वरत सुरु राहणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना तशाच पुर्वरत सुरु राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon