पाचोरा (प्रतिनिधी) – संत सेना नाभिक समाज बहुउद्देशीय मंडळ, पाचोरा यांच्यातर्फे संत गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड येथे संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी संत सेना महाराज रथाचे पूजन मंडळाचे अध्यक्ष रमेश जाधव, शोभा जाधव यांनी सपत्नीक पूजन केले. श्रींच्या रथाची श्री गजानन महाराज मंदिर, वृंदावन पार्क,एकता कॉलनी, पुनगाव रोड,रिंग रोड,भवरलाल नगर,जिजामाता कॉलनी ,बालाजी टाॅवर,नारायण नगर,लक्ष्मी नगर, ठाकरे नगर येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांसाठी लकी ड्रॉ काढून उत्कृष्ट साडीचे वाटप करण्यात येत होते. कार्यक्रम स्थळी रथाचे सांगता करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्कप्रमुख किशोर सूर्यवंशी तसेच जिल्हा संघटक रवींद्र बोरणारे, शांताराम खोंडे, मोहन नाना साळवी, नारायण सोनवणे, सुरेश कुवंर उपस्थित होते. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णराव वाघ, सचिव अनिल अहिरे, कार्यकारणी सदस्य गुलाब ठाकरे, विकास पगारे,मांगो राऊत,सुनील अहिरे,सुखदेव वाघ,रतन अहिरे, कल्पना अहिरे, शोभा जाधव तसेच समाजातील भास्कर सन्नांसे,, बारकू सोनवणे, काशिनाथ सोनवणे सर्व समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते. तसेच रात्री ह.भ.प.मठाधिपती गोविंद बाबा महाराज पाचोरेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.