जळगाव (प्रतिनिधी): – पाचोरा शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पोलीस शिपाई श्रीराम अनिल शिंपी (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता रेल्वे भुयारी मार्गाजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान सय्यद सैफ अली सय्यद अकबर अली (वय २६, रा. इमलीपुरा, जाम मोहल्ला, भुसावळ) याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व व्ही-१ तंबाखू असा एकूण ६,७८० रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.









