
दुसर्याच दिवशी डिस्चार्ज, शासकीय योजनेतून मोफत उपचार
जळगाव : कंबरदुखीसह डाव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि बधिरपणामुळे चालणेही कठीण झालेल्या ४८ वर्षीय रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत केवळ दोन टाके घेण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पायातील ताकद वाढली, वेदना व मुंग्या पूर्णपणे थांबल्या आणि दुसर्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
संबंधित ४८ वर्षीय पुरुष रुग्ण मागील एक महिन्यापासून कंबरदुखी आणि डाव्या पायात पसरणार्या तीव्र वेदनांनी त्रस्त होता. कंबरदुखीपेक्षा पायातील वेदना अधिक तीव्र होत्या. डाव्या पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे तसेच अवघे १०० मीटर चालल्यानंतर चालण्यास त्रास होणे, अशा तक्रारी होत्या. तपासणीमध्ये डाव्या पायातील स्नायूंची ताकद कमी झाल्याचे आढळले. विशेषतः घोटा आणि पायाच्या अंगठ्याची हालचाल करणार्या स्नायूंची ताकद ३/५ इतकी कमी झाली होती.एमआरआय लंबर स्पाइन तपासणीत एल ४-एल ५ आणि एल ५-एस१ या दोन मणक्यांमधील डिस्क सरकल्याचे ( पीआयव्हीडी प्रोलॅप्स्ड इंटरव्हर्टेब्रल डिस्क ) निदान झाले. त्यामुळे नसांवर दबाव निर्माण होऊन पायात वेदना, मुंग्या आणि स्नायूंची ताकद कमी होण्याचा त्रास होत होता.रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे एंडोस्कोपिक डिकंप्रेशन, लॅमिनेक्टॉमी आणि डिस्केक्टॉमी (लॅमिनेक्टोमी आणि डिस्केक्टोमीसह एंडोस्कोपिक डिकंप्रेशन) ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे छोट्या छेदातून मणक्याच्या भागात पोहोचून नसांवरील दबाव कमी करणे आणि सरकलेली डिस्क काढणे शक्य झाले. शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके घेण्यात आले.ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अतुल जाधव यांनी केली.डॉ. श्रुती खंडागळे व डॉ. प्रीतम दास यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब—हाटे यांनी जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या डाव्या पायातील स्नायूंची ताकद वाढली. पायातील वेदना, मुंग्या आणि बधिरपणाचा त्रास थांबला. रुग्णाला चालण्यातही सुधारणा जाणवली. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने दुसर्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.विशेष म्हणजे, या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. अत्याधुनिक एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचा लाभ आर्थिक भाराविना मिळाल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला.लहान छेद, केवळ दोन टाके आणि जलद रिकव्हरी हे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, मणक्याच्या आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी आधुनिक उपचारपद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे. डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले.










