पाचोरा (प्रतिनिधी) : तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे दहावीच्या शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, कुऱ्हाड हायस्कूलचे चेअरमन सतीश चौधरी, संस्थेचे संचालक योगेश माधवराव पाटील, मधुकर पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील उपशिक्षिका वनिता जगताप यांचा चिरंजीव चिन्मय जगताप याने नीट परीक्षेत ६४३ गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचासुद्धा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मानद सचिव ऍड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे पर्यवेक्षक आर.एल. पाटील यांची पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कलाशिक्षक सुबोध कांतायन यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम.वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर.ठाकरे, पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील, इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस. पाटील यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी यांनी मानले.