पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बाळद येथील सर्वेश मेडीकल चे संचालक समिर सोमवंशी हा युवक अपघातात ठार झाला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील समिर अविनाश सोमवंशी हा युवक आज दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बाळद येथुन पारोळा जात असताना वलवाडी गावा नजिक वळणावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार समिर सोमवंशी हा गंभीर जखमी झाला होता. यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, यावेळी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समिर यास आई भाउ पत्नी दोन मुली असा परिवार आहे. परीसरात मेडिकल आणि कृषी केंद्राचा त्याचा व्यवसाय होता. समिर सोमवंशी हा मनमिळाऊ स्वभावाने असल्याने परीसरात त्याच्या निधनाच्या बातमी ने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची बातमी मिळाली तेव्हा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली. शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.