पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व देवेन हॉटेल यांच्या सौजन्याने बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी कामगार यांच्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर अन्नछत्र योजना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहे . 25 रुपयात एक भाजी ,तीन पोळ्या किंवा पाच पुर्या मिळणार आहेत
शेतकरी बांधवांना बाहेर लागणारा जेवणाचा खर्च वाचणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून कामगार सुद्धा आनंदी आहेत आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ , मुख्य प्रशासक , सर्व संचालक , रणजीत पाटील , चंद्रकांत धनवडे, प्रा. एस डी पाटील , प्रवक्ते खलील देशमुख, नाना देवरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यासाठी भगवान मिस्तरी सहकार्य लाभत आहे यावेळी बाजार समिती सचिव बी.बी.बोरुडे, उपसचिव .प्रतिक ब्राम्हणे, लिपिक बालवीर सिंग शीख व रोहित देशमुख व्यापारी- सुभाष अग्रवाल , नगरसेवक विकास पाटील, माजी नगरसेवक भूषण वाघ , रोहित वाणी
उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी, व्यापारी बांधवांनी , हमाल, मापाडी कामगार यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे