पाचोरा (प्रतिनीधी)—येथील शिंदे इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी सृष्टी मिलिंद सोनवणे हीने प्रि नेट परिक्षेत यश संपादन केले. शिंदे इंटरनॅशनल स्कुलने शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये प्रि नेट परिक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित केले होते.
सदर परीक्षा ही ७२० गुणांची होती. सृष्टी मिलिंद सोनवणे हीने ६०० गुण मिळवून वर्गात तिसर्या क्रमांकाचे यश मिळवले. तिचा संस्थेच्या वतिने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव निरज मुणोद, प्रा.शिवाजी शिंदे, प्राचार्य विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाळेतिल विद्यार्थ्यांना प्रि नेट परिक्षेचे मार्गदर्शन शाळेच्या शिक्षक वर्गाने केले होते.सृष्टीच्या या यशाबद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.