पाचोरा :– बैलांना पाणी पाजत असतांना अचानक बैलाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आत्माराम चिंतामण साळुंखे (वय ६१, रा. सामनेर ता. पाचोरा) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २० जून रोजी दुपारी सामनेर शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सामनेर येथील आत्माराम चिंतामण सांळुखे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करीत असून गुरुवार दि. २० जुन रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आत्माराम साळुंखे हे शेतात गेले, ते शेतातील झाडाला बांधलेल्या खिल्लारी बैलजोडीस पाणी पाजण्यासाठी आत्माराम साळुंखे यांनी बैलांना सोडवित असतांना बैलजोडीतील एका बैलाने अचानक आत्माराम साळुंखे यांचेवर हल्ला चढविला. या हल्ल्यात आत्माराम साळुंखे यांच्या छातीच्या डाव्याबाजुस शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, शेतातच ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. बैलाने केलेल्य हल्ल्यात आत्माराम
साळुंखे हे गंभीर जखमी झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी आत्माराम साळुंखे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.