जामनेर ;- कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका १२ वर्षीय मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील जामनेर येथे घडली.
तोंडापूर ते फर्दापुर रस्त्यावर तोंडापूर गावाजवळ अजिंठा येथील उस्मान शाह इस्माइल शाह (वय ३४) व नुरा शहा महेमूद शहा (वय १२) हे मामा भाचे फत्तेपूर येथे आजीला भेटण्यासाठी दुचाकीने येत होते. यावेळी तोंडापूरकडून येणाऱ्या शिवना गावाकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवर मागे बसलेला मुलग फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक उस्मान शाह इस्माईल शाह हे जखमी झाले. अपघातांची माहिती मिळटाचा पहुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप व कर्मचारी यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.