१८ वर्षवरील युवकांना आज पासून वॅक्सिन सुरु
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील ग्रामीण रुग्णालयात वॅक्सिन उपलब्ध असतांना केवळ यंत्रणा अपुरी असल्याने नागरिक संतप्त झाले. अखेर कॉग्रेस मैदानात आल्यावर वॅक्सिन उपस्थितांना देण्यात आल्या असून आज १८ वर्षे वरील युवकांसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शहरातील एकच केंद्र पंचायत समिती सभापती निवासस्थानी वॅक्सिनचे उभारण्यात आले आहे. या केंद्रात दैनंदिन १०० लोकांनाच कोरोना लस दिली जाते. लसींचा साठा उपलब्ध असताना दुपारी केंद्र बंद केले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार यांना संपर्क केला असता त्यांनी लसी उपलब्ध आहेत आणि लाभार्थी असतील तर त्यांना शेवटी च्या लसी संपेपर्यंत दिल्याच पाहिजेत असे सांगितलेल्यावर अखेर दोन दिवसां पासून सकाळी पाच वाजे पासून आलेल्या जेष्ठ नागरिकांना कोशील्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरीक खुप संतप्त होते मात्र कॉग्रेस चे पदाधिकारी स्वतः मदतीला येऊन त्यांनी नागरिकांनी समजुन सागितले आणि महसूल अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातुन जवळपास चारशेहून अधिक लोकांना लसीकरण झाले. लसीकरण मोहीमेत जिल्ह्य़ातील वरीष्ठ अधिकारी यांनी स्थानिक लसीकरण केंद्र जास्तीत जास्त सुरु करावे अशी मागणी कॉग्रेस ने केली असून आज दि. ८ रोजी बाहेरपुरा भागातील नगर परिषद च्या दवाखान्यात १८ ते ४४ वर्षे वयाच्या लसीकरणाला सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर अजुन एक केंद्र भडगाव रोड परिसरातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालया जवळ तातडीने सुरु करावे अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार यांच्या कडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. वॅक्सिन ज्या संख्येने येतील त्या तात्काळ दिल्या जाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. लसीकरण मोहीम मध्ये परीचारीका ज्योत्स्ना पाटील, भारती देशमुख, विकी, कॉग्रेस सोशल मीडिया चे राहुल शिंदे, कल्पेश येवले, जगदीश पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.