सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहात दोन्ही ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि सलमानने चित्रपट प्रदर्शनाच्या आधी एक घोषणा केली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणाला पाहता राधे चित्रपटातून मिळालेली रक्कम ही गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.