• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in महाराष्ट्र
0

नागपूर (वृत्तसंस्था) – केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांना फैलावर घेतले.

उद्घाटनानंतर बोलताना गडकरी म्हणाले,’अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झालं आहे. सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,’ असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.

‘८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कामाला तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. पण मला याची लाज वाटतेय. जे विकृत विचारांचे लोक (अधिकारी) आहेत. ज्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या. हे सगळे १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, त्यांचे मार्गदर्शक हे लोक बनतात.

जे पूर्णपणे नकारात्मक आणि विकृत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारलं जातं, हे मला कळत नाहीये. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचं उदाहरण म्हणजे ही इमारत आहे. हे काम ज्यांनी पाहिलं, त्याचा एक संशोधन पेपर तयार करावा. आपण जे लोक घेतो, लायक नाहीत. या संस्थेचं इतकं नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत,’ असं गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘माझं नाव बदनाम झालंच आहे. मला रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती आहे. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे काम पूर्ण झाले बघण्यासाठी तीन सरकारं बदलून गेली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू. मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय’ अशा शब्दात गडकरींना अधिकाऱ्यांना सुनावलं.


 

 

Previous Post

तीनही महापौरांची अरविंद केजरीवालांच्या निवासाबाहेर आंदोलन सुरू

Next Post

काळजी करु नका अजित पवार अगदी ठणठणीत आहेत – अमोल मिटकरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काळजी करु नका अजित पवार अगदी ठणठणीत आहेत - अमोल मिटकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon