शिरसोली, ( प्रतिनिधी ) : – येथील खलसे परिवारातील निलेश दिलीप खलसे (बारी) यांनी ‘लॉ’ (विधी) पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विधी पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


निलेश खलसे हे बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष असून, खलसे परिवारातील पहिले विधिज्ञ ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दिलीप बारी, उपाध्यक्ष पंडितराव जाधव, संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश बारी, खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक सुनील भदाणे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निलेश खलसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
निलेश खलसे यांच्या या यशामुळे बारी समाजासह शिरसोली परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









