जळगांव (प्रतिनिधी) – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत माझी वसुधंरा अभियानाअंतर्गत झालेल्या वृक्षरोपण, सांडपाणी निचरा व घनकचरा व्यवस्थापन आदी कामांची पाहणी केली या अभियानामध्ये सर्वानी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करीत कामगाराचे कौतुकही केले. रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षरोपण, घरकुल योजना, शोषखड्डे लवकर कामे पुर्ण करण्याचीही सुचना केली. महसूल विभागाअंतर्गत मोफत सातबारा व खाते उतारा वाटप केले प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन सातबारा व खातेउतारा देण्यात यावा अशा सूचना तहसिलदार व तलाठी यांना दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त गमे यानी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून मजूरी वेळेवर मिळते की नाही याची पडताळणी केली. नविन मजूर नोंदणी किती झाली याबाबत आढावा घेतला.गांवातील नागरिकांशी संवाद साधून अडचणीबद्दल विचारणा केली.
या दौऱ्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील .श्रीमती नाकडे , .उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) दिगंबर लोखंडे , अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा अहिरे ,तहसिलदार , गटविकास अधिकारी ,पोलीस उपनिरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. सरपंच सुषमा पाटील , सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्य उपस्थित होते.