जळगाव (प्रतिनिधी) – साठ दिवसापासून धरणे आंदोलन सुरू असल्याचे माझ्या कानावर पडतातच मी आपले नियोजित कार्यक्रम सोडून आपल्या या धरणे आंदोलनात आपणास सक्रीय पाठिंबा देण्यासाठी आली असून आपल्या धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी जि यांना विनंती करते की त्यांनी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा तसेच आमचा आमच्या पक्षा द्वारे मागणी करते की अमित शहा यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशा प्रकारचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी धरणे आंदोलनात अकस्मातपणे येऊन दिले.
जळगाव मुस्लिम मंच द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर ६० दिवसापासून धरणे आंदोलन सुरु असून आज आज नेहमीप्रमाणे धरणे आंदोलन सुरू झाल्यावर विविध वक्ते आपापले विचार मांडत होते मुस्लिम मंच समन्वयक फारुक शेख यांना एक फोन आला व खासदार सुप्रिया सुळे आपल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत आहे असा निरोप मिळताच फारुक शेख यांनी त्वरित आपल्या सर्व सहकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलून घेतले व त्वरित निवेदन तयार केले सुप्रिया ताई आल्यावर त्यांचं स्वागत प्राध्यापिका डॉ फिरदोस सिद्दिकी व प्राध्यापिका सौ अनिता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व प्रथम फारुक शेख यांनी ६० दिवसाच्या धरणे आंदोलनाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर विशद केली व निवेदनाचे वाचन केले निवेदनात स्पष्टपणे मागणी करण्यात आली की महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण महाराष्ट्र १ मे 2020 पासून महाराष्ट्रात एन पी आर लागू करनार आहे तो आपण लागू करू नका व तसा ठराव या अर्थ संकल्पीय अधिवेशनात पारित करावा अशी एकमुखी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
सुप्रिया ताईंनी आंदोलन कर्त्यांन चे अभिननदन केले व आपण ६० दिवसा पासून शांततेत आपला निषेध नोदवित आहात ही गौरवाची बात आहे। त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होणार नाही किंवा कोणालाही बाहेर काढण्यात येणार नाही एवढेच नव्हे तर आपल्याला कोणालाही कोणतेही कागदपत्र दाखवायचे नाही आम्ही जनगणनेला सहकार्य करू परंतु एनपीआर ला सहकार्य करणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली .
सरकार हे एका पक्षाचे नसून तीन पक्षाचे असल्याने त्यावर लवकरच समन्वय समिती निर्णय घेणार असल्याचे सुद्धा त्यांनी सूतोवाच केले.
आंदोलनस्थळी करीम सालार यांनी एनपीआर का नको याबाबत प्रकाश टाकला तर गफ्फार मलिक यांनी सुप्रिया ताईंचे व खास करून राज्यसभेत ताईंनी ट्रिपल तलाक ,भारतीय नागरिकत्व कायदा बाबत जे काही म्हणणे मांडले होते त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर ,माजीआमदार संतोष चौधरी, विलास पाटील अभिषेक पाटील ,सलीम इनामदार , मजहर पठान, उन्मेष नेमाड़े, फिरोज पठाण ,मजहर पठाण यांचीसुद्धा उपस्थिती होती.
एम आय एम चे सुधा निवेदन एम आय चे नगरसेवक तथा गटनेते रियाज बागवान हाजी शहीद यांनीसुद्धा खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन दिले व त्यात त्यांनी सुद्धा मागणी केली की हा कायदा रद्द होण्यासाठी आपल्या पक्षाचा मार्फत महाराष्ट्र शासनावर दबाव आणा
*धरणे आंदोलनाला सुरवात* धरणे आंदोलनाची सुरुवात अल्ताफ शेख याच्या कुराण पठणाने तर सांगता हाजी गफ्फार मलिक यांच्या दूआ ने करण्यात आली
यावेळी मुकुंद सपकाळे, सचिन धांडे मुफ़्ती हारून गफ्फार मलिक, हाजी रसूल शेट पाचोरा, मुस्कान खाटीक, डॉक्टर फिरदोस सिद्दिकी, यांचीसुद्धा भाषणे झाली.
*निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
करीम सालार यांच्या नेतृत्वात फारुक शेख, सलीम इनामदार फिरोज पठाण, अन्वर सिकलिगर फारुक अहलेकार आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.