अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मारवड पो.स्टे हद्दीतील निम शिवारात एकनाथ नामदेव कोळी नामक इसमाची अवैध हातभट्टी मारवाड पोलिसांनी केली उध्वस्त.
सविस्तर माहिती अशी की, मारवड पो.स्टे हद्दीतील निम शिवारात एकनाथ नामदेव कोळी याचे शेतात अवैध रित्या गावठी दारू ची हातभट्टी असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने मारवाड पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल फुला यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकारी सोबत छापा मारुन ४५००/-रु कि.चे दोन ५० मापाचे प्लास्टीक कॅन त्यात सुमारे १०० लिटर गुळ रसायन मिश्रित रसायन व पत्र्याचा २०० लिटर मापाचा ड्रम त्यात ५०लिटर रसायन कि.अ.व ६००/- कि.चे २०लिटर मापाचा प्लास्टीक कन त्यात सुमारे १५ लिटर गा.ह.भ.ची दारु आंबट व उग्र वासाची कि.तसेच एक जिवंत हात भट्टी त्यात एक पत्री ड्रम,गाळणी,एक प्लास्टीक पाईप,तगारी,जळतण वगैरे साहीत्य असे एकुण:५१०० रु किंमतीचा माल जागीच पकडुन नष्ट केला व प्रो.गु.र.न १३/२०२० दि.२८/०२/२०२० मु.प्रो.अक्ट ६५(क)(ड)(ई)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर रेड कामी पो.ना. मुकेश साळुंखे ,पो.ना. विशाल चव्हाण असे होते. सदर कामगीरी चे मारवाड परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच अवैध धंदे करणाऱ्या समाजकंटका मध्ये भीती चे वातावरण पसरले आहे.