जळगाव (प्रतिनिधी) – शेंदुर्णी जवळ नुकताच अपघात झाला आहे. त्या अपघातात एक जण ब्रॉड डेड स्थितीत तर दोन जण गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले होते. त्यात एक जण उपचार सुरू असताना आणखी मयत झाला असून उर्वरित एक जण आयसीयूमध्ये उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान जखमींना वाचण्यासाठी डॉक्टरांचा आटापिटा सुरू असताना रामानंदनगर भागांमध्ये मद्यपींनी गोंधळ घातल्यानंतर तेथील किरकोळ जखमी होऊन दोन मद्यपी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आले असतात पहिले आम्हाला तपासा असे डॉक्टरांना सांगू लागले. डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही आधी शेंदूर्णीचे गंभीर येथील रुग्ण बघतो मग तुम्हाला मलमपट्टी करून देतो.त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. मात्र या दोघीं मद्यपी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्याच वेळी एक मद्यपी संदीप बापू पाटील ऊर्फ शेड्या नामक याने डॉक्टर उमेश जाधव यांच्या छातीत बुक्का मारला तर हात फिरवण्याचाही प्रयत्न केला त्याचबरोबर डॉक्टर विपीन खडसे यांनाही मारहाण केली. दोघे डॉक्टर जखमी झाले. मात्र तरी देखील शेंदुर्णी येथील जखमींना उपचार करण्यासाठी ते आपत्कालीन विभागांमध्ये गेले. परंतु या मद्यपान केलेल्या तरुणांनी काही वेळ गोधळ घातला या मद्यपान केलेल्या तरुणावर याआधी पण गुन्हा दाखल आहे असे समजते.
दरम्यान उप वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मालकर यांनी घटनास्थळी उपस्थित माहिती जाणून घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहे.