• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामठीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त जमावाने शिक्षकाची कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक

आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरून जमाव आक्रमक; पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या अन् सौम्य लाठीमार

जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील जामठी येथे एका खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करून अयोग्य मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने संशयित शिक्षकाची कार पेटवून दिली, तर त्याला जमावाच्या ताब्यात देण्याच्या मागणीवरून पोलिसांवरही दगडफेक केली. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

जामठी येथील खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेकडो नागरिकांचा जमाव संशयित शिक्षकाच्या घरावर चालून गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरही जमावाचा रोष शांत झाला नाही. जमावाने शिक्षकाची घरासमोर उभी असलेली कार पेटवून दिली. तसेच आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या वाहनातून खाली उतरवून थेट जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी करत पोलिसांना घेराव घातला. यावरून पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी संशयिताला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू करण्यात आली.

दगडफेक वाढल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही जमाव पांगण्यास तयार नसल्याने अखेर सौम्य लाठीमार करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईनंतर जमाव हळूहळू पांगला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त जामठी गावात दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीनंतर परिसरातील तणाव निवळला असून सध्या गावात शांतता आहे. या प्रकरणी संशयित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास बोदवड पोलीस करत आहेत.


 

 

Previous Post

खळबळ : शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय..!

Next Post

जामनेरमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये तरुणीवर बलात्कार; आरोपीकडून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon