नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने लॉकडाऊनची तारीख 30 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या २१ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउन कालावधीत वाढ करणारे ओडिशा हे देशातील पहिलेच राज्य आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्राला ३० एप्रिलपर्यंत रेल्वे आणि हवाईसेवा सुरू न करण्याची विनंती केली आहे. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्था १७ जूनपर्यंत बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात आतापर्यंत एकूण 5,734 रुग्ण आढळले असून त्यापैकी 166 लोकांचा मृत्यू झाला आहे.