जळगाव ;- जिल्हा सामान्य रूग्णालयात संशयित कोराना म्हणून १५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते. त्यातील १४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. यात तीन, चार व पाच महिन्याच्या बाळांचा समावेश आहे.अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी आज दिली .
सध्या कोरोनाचा प्रकोप पाहता तातडीने लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . ८ एप्रिल रोजी १५ जणांचे स्वॅब औरंगाबाद येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यातील १४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. एक अहवाल येण्याचा बाकी आहे. यात तीन, चार व पाच महिन्याच्या बाळांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.