औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे आपण दु:खी आहोत. मी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शक्य ती सर्व मदत दिली जाणार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांनी हे आश्वासन ट्विटच्या माध्यमातून दिले.
Narendra Modi
✔
@narendramodi
Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided.
70.8K
8:51 AM – May 8, 2020
Twitter Ads info and privacy
15.2K people are talking about this
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ मजूर या अपघातातून बचावले आहेत. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला.
दरम्यान लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.