जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली ठेवण्याची परवानागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत यावर चर्चा झाली.
लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.