• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाणी वापराबाबत आपण फारसे गंभीर नाही ही खंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2024
in खान्देश, जळगाव
0
पाणी वापराबाबत आपण फारसे गंभीर नाही ही खंत

जागतीक जल दिनानिमित्त जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डाॅ. बी.डी. जडे यांची माहिती

जागतिक जल दिन हा दरवर्षी २२ मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने रिओ डी जानेरो (ब्राझील) येथे २२ मार्च हा दिवस जागतीक जल दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले. आपल्याकडील स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व पाण्याच्या साठ्यांचे शाश्वत संरक्षणाकरीता कार्यरत राहणे ह्याचा संदेश देण्याकरीता ह्याचा उद्देश आहे. २२ मार्च २०२४ ह्या जागतीक जल दिनाचा संदेश आहे शांततेसाठी पाणी. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही हे माहिती असुनही पाणी वापराबाबत कोणीही फारसे गंभीर नाही. शांततेसाठी पाणी हे वाचल्यानंतर लगेचच लक्षात येते गल्लोगल्ली, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, तालूका-तालूक्यात, जिल्हा-जिल्ह्यात, राज्या-राज्यामध्ये, देशा-देशांमध्ये पाण्याकरीता वाद सुरू आहेत.

तसे पाहिले तर पाणी हे पुरेसे आहे परंतु त्याचा वापर, त्याचे व्यवस्थापन काटेकोर नाही, डोळसपणे केले जात नाही. म्हणून तर त्यामधून वाद निर्माण होतात. पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी टाकू शकते. जेव्हा पाण्याचा वाटप असमान होतो त्यावेळी लोकांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये तणाव निर्माण होतो. जेथे-जेथे पाणी आहे तेथील जीवन सुखमय आहे, त्या भागात समृद्धी आलेली बघावयास मिळते. परंतु जेथे भरपूर पाणी आहे आणि जेथे पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी, भिषण अवस्था आहे तेथे दोघही ठिकाणी समस्या आहेत. जागतीक जल दिन २०२४ मधून संदेश असा आहे की पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्ष निर्माण करू शकते. समृद्धी आणि शांतता पाण्यावर अवलंबून असते.

पाणी आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते. ह्या करीता पाण्याच्या संबंधीत असणाऱ्या, पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने हे गांभीर्याने समजून घेतले पाहिजे आणि ह्या मोहीममध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठा सदस्य शाळा, महाविद्यालये, खाजगी कंपन्या, सरकारी कंपन्या, कार्यालये, विविध संस्था, शासन ह्यांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवून पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने, योग्यतेने कसा होईल, पाण्याचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी, खबरदारी कशी घेता येईल ह्यावर विचार मंथन चिंतन केले पाहिजे. प्रामुख्याने शेतकरी वर्गाने अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

जगाच्या एकुण फक्त ४% पाणी आपल्याला उपलब्ध आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ९७% पाणी समुद्रांमध्ये आहे, २% पाणी बर्फाच्या स्वरूपात उत्तर आणि दक्षिण धृवांवर उपलब्ध आहे. ०.४% पाणी १००० मिटर पेक्षाही खोल आहे, ते पाणी खारवट आहे. फक्त ०.६% पाणी हे गोडपाणी आहे आणि सर्व गोष्टीसाठी वापर करावयाचा आहे. आपल्याकडे भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. उपलब्ध पाण्यापैकी ८०% पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो, तर उर्वरीत पाण्याचा वापर उद्योगधंदे आणि नित्य गरजांकरीता वापर केला जातो. शेती व्यवसायामध्ये पाण्याचा प्रचंड वापर होतो, तसेच पाण्याचा अपव्ययही होतो. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक होण्याची गरज आहे.

खुप जादा पाणी वापर करूनही पिकांचे उत्पादन वाढत नाही हे अजूनही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, हे लक्षात येण्याची गरज आहे. ह्याकरीता ठिबक सिंचन, तुषार सिंचन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याचा कमी वापर करूनही अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळेल. शेती व्यवसाय बरोबरच कारखानदारी, उद्योगधंदे करणाऱ्यांनी सुद्धा पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे. कारखान्यातून निघालेल्या पाण्याचा पूनरवापर करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे. घरगुती वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापराबाबतही जनजागृती झाली पाहिजे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सकाळपासून दिवस निघाल्यापासून दिवस संपेपर्यंत ज्या-ज्या वेळी पाण्याचा वापर होणार आहे, तो काटकसरीने कसा होईल ह्यावर कार्यवाही झाली पाहिजे.

राजस्थानसारख्या वाळवंटी भागात, ज्या खेड्यांमध्ये शेतीला पाणी नाही, पिण्याच्या पाण्याकरीता महिलांची होणारी पायपीट पाण्याचे महत्त्व सांगणारी आहे. ह्यातून खरंतर बोध घेतला पाहिजे आणि पाण्याचा जपून, काटकसरीने वापर करण्याचे शिकले पाहिजे. पाणी नसेल तर सर्वांचे अस्तीत्व संपण्यास वेळ लागणार नाही. म्हणून पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने आपल्याकडील पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने वापर तसेच पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण केले पािहजे. नाहीतर पाणी नाही तर जीवन नाही. जागतीक जल दिन नुसते औपचारिक रित्या साजरे न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दररोज केली पाहिजे. जागतीक जल दिन केवळ एक दिवस न राहता तो रोज कसा व्यवहारात आणता येईल हीच काळाची गरज आहे.


 

 

Previous Post

महाविकास आघाडीत सर्वात पहिले काँग्रेसचे सात उमेदवार जाहीर

Next Post

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी 'चला, सूतकताई शिकू या !' उपक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon