मुंबई (वृत्तसंस्था) – श्री गोडवाड जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, शुक्रवार पेठ, यांच्यावतीने लॉकडाउनच्या वेळी सेवा बजावणारे पोलिस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिकेवरील वाहनचालक या सर्वाना लोकांना दुपारचे सात्विक भोजन दिले जाते.
चपाती, 2 प्रकारच्या भाज्या, डाळी, असे अन्न वेगवेगळ्या ऍल्युमिनियम फॉइल असलेल्या बॅगमध्ये पॅक केले जातात. लिंबु लोणची, पाण्याची बाटली यासह चमचा आणि इतर वस्तूंनी पॅक केलेले भोजनाचे पाकिट या मंडळीना जागेवर पोच केले जाते. करोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचे लॉकडाउन केले,त्याच्या पहिल्या दिवसापासुन हा उपक्रम सुरु केला असुन लॉकडाउनच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु असणार असुन रोज जवळपास 1 हजार लोकांच्या जेवणाच्या पाकिटांची सोय केली जाते.तसेच नाकबंदीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांसाठी संध्याकाळी गरम मसाला चहा दिला जातो.या सर्वांचे नियोजन ट्रस्टचे सेक्रेटरी गणपती मेहता आणि कमलेश नाहर हे पाहत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष फतेचंदजी रांका, सचिव गणपतीजी मेहता, सहसचिव, शांतीलालजी बाल्डोटा आणि सर्व विश्वस्त मंडळे यांनी हा उपक्रम राबविला असुन कमलेश नहार, किरण बाफना, मनोज शहा, सनी बाल्डोटा, अशोक लोढा, परसमल बोराणा, भद्रेश बाफना,सुरेश राठोड आणि ट्रस्ट मंडळाचे अन्य विश्वस्त मंडळे व इतरांच्या मदतीने हे काम सुरू आहे.