अयोध्या ( वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाची तयारी सुरू असताना, संत वर्गाने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे अशी मागणीही सुरू केली आहे. केंद्र सरकारने मागणी पूर्ण न झाल्यास ‘जल समाधी’ घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही वादग्रस्त मागणी तपस्वी छावणीचे परमहंस आचार्य महाराज यांनी उपस्थित केली आहे, मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायाचे नागरिकत्व रद्द करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडे केले आहे. ते मंगळवारी म्हणाले, ‘2 ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे, अशी माझी मागणी आहे, अन्यथा मी सरयू नदीत जल समाधी घेईन. केंद्राने मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील लोकांचे नागरिकत्वही रद्द केले पाहिजे.






