जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत आपल्या कैदेत असलेल्या पतीचा मृत्यू झाला आहे असा आरोप करीत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर करावी न झाल्यास २ मुलांसह आत्मदहन करुत असा इशारा या कैद्याच्या विधवा पत्नीने कारागृह विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनातील तपशिलानुसार , चिन्या उर्फ रवींद्र जगताप हा जळगाव कारागृहात न्यायालयीन बंदी होता त्याचा कारागृहातच ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता. तत्कालीन तुरुंग अधीक्षक पेटरस गायकवाड आणि जेलर जितेंद्र माळी यांनी केलेल्या मराहणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालातही मराहणीमुळेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यापूर्वीही या कैद्याच्या विधवा पत्नी मीना जगताप यांनी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे गायकवाड आणि माळी हे दोघेही महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्या मर्जीतील असल्याने त्यांना अभय दिले जात आहे माझ्या पतीचा मृत्यू दडपण्यात ते यशस्वी झाले आहेत या दोषींवर कारवाई होत नसल्याने मीना जगताप यांनी न्यायासाठी उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका ( क्र १७०६ / २०२० ) दाखल केलेली आहे. जितेंद्र माळी यांची मूळ नियुक्ती नंदुरबार कारागृहात असतानाही त्यांना हा गुन्हा दडपण्यासाठी कारागृह प्रशासनाने जळगाव कारागृहात नियुक्ती दिली आहे. पेटरस गायकवाड यांची अहमदनगर कारागृहात बदली झाल्यावरही त्यांना याच कारणासाठी धुळे कारागृहात नेमलेले आहे असा आरोपही मीना जगताप यांनी केला आहे.
माझ्या आरोपांच्या पुराव्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही असे मीना जगताप यांचे म्हणणे आहे. आता मी मुलांसह रस्त्यावर आलेली आहे मला न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्मदहन करण्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नाही , असा इशारा मीना जगताप यांनी या निवेदनात दिला आहे .







