• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मार्च एंडिंग मुळे जिल्हा परिषदेत अधिकारी ठेकेदारांची वाढली गर्दी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेत मार्च एंडिंग च्या कामांसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. बुधवारी मार्च एंडिंग च्या कामासाठी शेवटचा दिवस असल्याने लोकप्रतिनिधींसह ठेकेदारांची जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. शासनाच्या विविध योजनांचा निधी मार्गी लावण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला असून रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये कामकाज सुरू होते. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभाग वगळता इतर विकासाच्या योजनांना ब्रेक लागला होता . डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पादुर्भाव असल्याने 27 जानेवारीपासून शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात कामांची वर्दळ वाढली होती . तसेच जिल्हा परिषदेच्या विविध योजना पटलावर घेऊन नवीन कामांना सुरुवात झाली होती . मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढल्याने शाळा, महाविद्यालय बंद करण्यात येऊन पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. सन 2021 22 या वर्षासाठी जिल्हा परिषदेचा 16 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे.

आता मार्च एंडिंग च्या कामांची सर्वच विभागात वर्दळ वाढली आहे . त्यात शनिवार , रविवार आणि होळी धुलिवंदनच्या सुट्टी सुट्ट्यांमुळे जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. मात्र मार्च एंडिंग या कामांसाठी अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले असून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, सिंचन, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग,पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग,आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांच्या नवीन बांधकाम योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी एकच धावपळ उडाली. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मार्च एंडिंगचे कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.सामान्य प्रशासन विभाग वगळता बांधकाम विभागाने 30 54, 50 54, जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास योजना, रस्ते दुरुस्ती आदी योजनांचा समावेश आहे. सिंचन विभागात जिल्ह्यातील छोटे लघुपाटबंधारे दुरुस्ती व बांधकाम करणे,शिक्षण विभागात नवीन शाळा खोल्या बांधकाम,शाळा दुरुस्त्या कामांना सुरुवात करण्यात आली होती . महिला व बालकल्याण विभाग विभागात अंगणवाडी दुरुस्ती,नवीन अंगणवाडी बांधकाम तर कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची कामे पूर्ण करणे,ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना,प्रधानमंत्री पेजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना आदी कामे करण्यावर भर दिला जात आहे.तसेच पशुसंवर्धन विभागात जनावरांसाठी औषध खरेदी करणे, जिल्हा परिषद आरोग्य विभागात उपकेंद्र बांधकाम,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम दुरूस्तीची कामे करणे,औषधी साठा खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.

यंदा जिल्हा जिल्हा परिषदेच्या 16 कोटी चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून आता मार्च एंडिंग च्या कामाची धावपळ सुरू आहे.जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या विविध योजनांची कामे मार्गी लावण्यात येत आहे.शासनाच्या विविध योजना वरील निधीला प्रशासकीय मान्यता देऊन खर्चाचा लेखाजोखा सादर करण्यात येत आहे. -विनोद गायकवाड वित्त व लेखा अधिकारी जि.प. जळगाव


 

 

Previous Post

आ. मंगेश चव्हाणांसह इतरांची नाशिक कारागृहात रवानगी

Next Post

वरणगाव शहराजवळ चार लाखांचा गुटखा जप्त : एलसीबी पथकाची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वरणगाव शहराजवळ चार लाखांचा गुटखा जप्त : एलसीबी पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026
विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !
1xbet russia

विशाल देवकर, प्रतापराव पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा !

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon